नियमावली
१) संस्थेचा सभासद कोणताही भारतीय नागरिक होऊ शकतो.
२) सभासदाने संस्थेच्या उद्दिष्टांशी सहमत असणे आवश्यक आहे.
३) प्रवेश फी व वार्षिक फी कार्यकारी समिती ठरवेल व प्रत्येकि सभासदांना प्रति महा १०० रु. (अक्षरी शंभर रुपये) प्रमाणे फी देणे बंधनकारक आहे
४) सभासद नोंदणीसाठी अर्ज भरावा लागेल.
५) सभासदांनी संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा.
६) संस्थेची निती, धोरणे व नियमांचे पालन करणे आवश्यक.
७) संस्थेच्या इतर सभासदास सोबत गुण्यागोवींदाने राहणे किंवा इतर सभासदाना सोबत वाद झाल्यास तुमचे सभासद पद रद्द करण्याचा अधिकार
कार्यकारी मंडळाला असेल .
८) संस्था आवश्यकतेनुसार नियमावलीत बदल करू शकते. यासाठी 2/3 बहुमताने सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर होणे आवश्यक आहे.
(टीप :- संस्थेने सर्व अधिकार कार्यकारणी मंडळाकडे राखून ठेवले आहे )
