संस्थेचे उद्देश
1. सर्वसामान्य जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करून त्यांच्यात बंधुभाव, सौहार्द व प्रेम निर्माण करणे.
2. महिलांसाठी उद्योगधंद्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित, रोजगार मेळावे भरविणे, महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे.
3. शिक्षण व शिक्षणाविषयी महिलांना प्रोत्साहित करणे, खेळामध्ये मार्गदर्शन शिबिर भरविणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
4. महिलांचे उत्थान यासाठी महिलांना मिळणाऱ्या आवश्यक त्या शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करणे.
5. बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे.
6. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रयत्न करणे.
7. विविध प्रकारच्या कला, क्रीडा स्पर्धा आयोजन करणे, कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे, वर्षासंमोष आयोजन करणे.
8. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ती शैक्षणिक मदत करणे.
9. वाचनालय, सार्वजनिक वाचनालय स्थापन करणे, चालविणे, चालविण्यास मदत करणे.
10. गरीब व गरजू लोकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत करणे.
11. वैद्यकीय शिबिरे भरविणे, नेत्रचिकित्सा शिबिर, रक्तदान शिबिर भरविणे, भरविण्यास मदत करणे.
12. वाढत्या समाजातील वेगवेगळ्या अडीअडचणी सोडविणे, सोडविण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करणे.
13. सार्वजनिक संस्थांसाठी असलेले शासकीय, निमशासकीय तसेच महानगरपालिकेच्या योजना त्यांना वेळेवर आणि अधिक माहिती राहून सांगणे.
14. नैसर्गिक आपत्तींनी बाधित झालेल्यांना आवश्यक ती मदत करणे.
